देवरूख कृषी विद्यालयात नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रात्यक्षिक
रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : देवरूख येथील प्रा. मधू दंडवते कृषी तंत्र विद्यालयात नारळमित्र चेतन लक्ष्मण नाईक यांनी विद्यार्थ्यांना नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रात्यक्षिक व माहिती दिली. कार्यशाळेत नारळाचे उगमस्थान, प्रकार, आणि जाती, महत्व आणि उ
नारळ काढण्याचे प्रात्यक्षिक


रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : देवरूख येथील प्रा. मधू दंडवते कृषी तंत्र विद्यालयात नारळमित्र चेतन लक्ष्मण नाईक यांनी विद्यार्थ्यांना नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रात्यक्षिक व माहिती दिली.

कार्यशाळेत नारळाचे उगमस्थान, प्रकार, आणि जाती, महत्व आणि उपयोग, बाय प्रॉडक्ट, शास्त्रशुद्ध लागवड पद्धती, आंतरपिके व लाखीबाग, खते व पाणी व्यवस्थापन, नारळाचे रोग व आजार, नारळाच्या कीटकांचे प्रकार, नारळाच्या स्वच्छतेवेळी वापरावयाची कीटकनाशके, एकात्मिक पद्धतीने नारळ पिकाचे संरक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन तसेच नारळाच्या झाडावर चढण्याच्या शिडीची माहिती व प्रकार, शिडीद्वारे नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रात्यक्षिक, शहाळी व परिपक्व नारळ ओळखणे, झाडास पाहून कीड व रोग, खतांची कमतरता ओळखणे, नारळाच्या झाडाचे त्याच्या जातीनुसार वय ओळखणे, मित्रकीटकांची ओळख, सेंद्रिय शेती, सेंद्रिय कीटकनाशके आणि सेंद्रिय खत यांची निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणासाठी उपस्थित कृषि पदवीका आणि पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविकेच्या सर्व विद्यार्थ्यांनी नारळाच्या झाडावर चढण्याची प्रत्यक्षिके केली.

नारळमित्र तज्ज्ञ प्रशिक्षक चेतन लक्ष्मण नाईक यांचे विद्यालयामार्फत विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वाडकर यांनीं आभार मानले. यापुढे संस्था आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी विविध विषयांत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जाईल, असे नारळ मित्र चेतन लक्ष्मण नाईक यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande