
नांदेड, 01 एप्रिल (हिं.स.)। हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केला. यात वीज कोसळून गाय दगावली तर दोन जनावरे किरकोळ जखमी झाली.
चिंचगव्हाण शेतकरी यांच्या आखाड्यावर ४-५ जनावरे बांधलेली होती. वादळी वारे व वीज कोसळल्याने या शेतकऱ्याची १ गाय ठार तर २ जनावरे किरकोळ जखमी झाली. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे.
शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. परिसरात ढगाळ वातावरण आहे. रिमझिम पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने शेतकरी हतबल झाला आहे. पावसामुळे २ जनावरांचा मृत्यू झाला आहे. नांदेड तालुक्यातील काकांडी मार्गे पासदगाव येथे वीज पडून एक वासरू ठार झाल्याचे तर सावरगाव कला येथील बैल मयत झाल्याची माहिती मिळाली आहे.
बिलोली तालुक्यातकाही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या पिकांचे आणि आंब्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतातील सौर यंत्रणेचेही नुकसान झाले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis