
जळगाव, 01 एप्रिल (हिं.स.) : शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, जिल्हापेठ पोलिसांनी भजे गल्लीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे.
नवीन बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरी झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, अटक केलेल्या आरोपींनी भजे गल्लीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून होंडा कंपनीची ड्रीम दुचाकी जप्त केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने केली. या पथकात फौजदार शांताराम देशमुख, हेड कॉन्स्टेबल महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंखे, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांचा समावेश होता.
-----------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर