
सोलापूर, 01 एप्रिल (हिं.स.)।
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मड्डी वस्ती परिसरात मी वडार महाराष्ट्राचा संघटना व तमाम वडार समाजाच्या वतीने समाजाचे श्रद्धास्थान बजरंगबलीची ५१ फुटी मूर्ती साकारण्यात आली असून लवकरच अनावरण होणार आहे. यानिमित्ताने समाज बांधवांना संघटित करण्यासाठी एक प्रयत्न करण्यात येत असल्याचे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितले.
प्रत्येक समाजाचे एक श्रद्धास्थान असते.त्याचप्रमाणे वडार समाजाचे आराध्य दैवत बजरंगबली असल्याने राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोलापूर येथे महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल ५१ फूट उंचीची बजरंगबलीची मूर्ती साकारण्यात आली असून यासाठी तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. ही मूर्ती मूर्तिकार शेखर शहाणे यांनी साकारली आहे. या वर्षी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला दुग्दाभिषेक करण्यात आले आहे व जयंतीदिवशी महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले आहे यासह विविध धार्मिक कार्यक्रम, संघटनाचे मेळावे या निमित्ताने घेऊन वडार समाजाला संघटित करण्याबरोबरच त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे असल्याचे चौगुले यांनी सांगितले.
लवकरच या मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री,शहरातील सर्व आमदार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाला एकसंघ बनवून बळकती निर्माण करण्याची प्रेरणा बजरंगबलीच्या माध्यमातून मिळत असल्याने आमचे आराध्य दैवत बजरंगबलीची मूर्ती साकारण्यात आल्याचे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड