
जळगाव, , 01 एप्रिल, (हिं.स.) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान बदलाला अनुकूल शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी एप्रिल २०२६ महिन्यात ‘डिजिटल शेतीशाळा २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये कृषी तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना पिक व्यवस्थापन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, निविष्ठा उत्पादन तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही डिजिटल शेतीशाळा ऑनलाइन माध्यमातून दर आठवड्याला सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात येणार असून त्याचे थेट प्रक्षेपण युट्यूबद्वारे करण्यात येईल.
डिजिटल शेतीशाळा लिंक
1)www.youtube.com/@agricultureDepartmentGoM
2)www.youtube.com/@PoCRAMaharashtra/streams
3)www.youtube.com/@Pannifoundation/live
या डिजिटल शेतीशाळेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि. १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व नियोजन, दि. ८ एप्रिल रोजी निविष्ठा/ जैविक उत्पादन, दि. १५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि दि. २२ एप्रिल रोजी भात शेतीचे लागवड तंत्रज्ञान या विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शेतकरी गट, कृषी ताई, एफपीओ (FPO) तसेच महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर