नांदेड तहसील कार्यालयात कामकाज पारदर्शक, दलालांवर कारवाई
नांदेड, 01 एप्रिल (हिं.स.) : नांदेड येथील तहसील कार्यालयात नियमित कामकाजासाठी मुख्य प्रवेशद्वाराचा वापर होत असून इतर दरवाजे केवळ गर्दी किंवा आपत्कालीन परिस्थितीत उघडले जातात. तहसील कार्यालयात दररोज तालुक्यातील सर्व गावांतील नागरिक, शेतकरी तसेच महसू
नांदेड तहसील कार्यालयात कामकाज पारदर्शक, दलालांवर कारवाई


नांदेड, 01 एप्रिल (हिं.स.) : नांदेड येथील तहसील कार्यालयात नियमित कामकाजासाठी मुख्य प्रवेशद्वाराचा वापर होत असून इतर दरवाजे केवळ गर्दी किंवा आपत्कालीन परिस्थितीत उघडले जातात. तहसील कार्यालयात दररोज तालुक्यातील सर्व गावांतील नागरिक, शेतकरी तसेच महसूल, शैक्षणिक आणि निराधार योजना संबंधी कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात.

तहसीलदारांनी सांगितले की, कार्यालयीन कामात अडचण किंवा विलंब झाल्यास थेट तहसीलदारांना भेटणे योग्य आहे. कार्यालयीन अधिकाऱ्यांना दलालांमार्फत अनावश्यक त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदारांनी दलालीवर कडक कारवाई केली, ज्यामुळे कार्यालयातील दलालांची वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

तहसील कार्यालय परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असून सर्व कामकाज पारदर्शकपणे होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पश्चिमेकडील दरवाजा कायम उघडा ठेवण्याबाबत काही नागरिकांनी मागणी केली आहे, मात्र त्या बाजूस महिला प्रसाधनगृह असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा दरवाजा फक्त आवश्यकतेनुसार उघडला जातो.प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कार्यालयीन कामकाजात अंधश्रद्धा, गैरसमज किंवा अनावश्यक हस्तक्षेप करू नयेत.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande