नालंदा चेंगराचेंगरी प्रकरण : मंदिराच्या पुजाऱ्यासह ४ जणांना अटक, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल
पाटणा , 01 एप्रिल (हिं.स.)।नालंदा येथील शीतला माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका पुजाऱ्यासह चार जणांना अटक केली असून, गर्दी व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि अव्यवस्था निर्माण केल्याच
नालंदा चेंगराचेंगरी प्रकरण : मंदिराच्या पुजाऱ्यासह ४ जणांना अटक, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल


पाटणा , 01 एप्रिल (हिं.स.)।नालंदा येथील शीतला माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका पुजाऱ्यासह चार जणांना अटक केली असून, गर्दी व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि अव्यवस्था निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, तपासाच्या आधारे आणखी अटक होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणात एकूण ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये २० जण नामनिर्देशित तर २० अज्ञात आरोपींचा समावेश आहे.पोलिस सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत. घटनेच्या प्रत्येक पैलूची गंभीरतेने चौकशी केली जात आहे.राज्य सरकारचे मंत्री श्रवण कुमार यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या दुर्दैवी घटनेतील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांपासून दूर राहावे, असेही त्यांनी सांगितले. सरकार पीडित कुटुंबीयांसोबत ठामपणे उभी असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंगळवारी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे हा अपघात घडला. अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झाले.गर्दी नियंत्रणासाठी पुरेशा व्यवस्था नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण प्रकरणाचा पोलिस आणि प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.लवकरच सर्व दोषींना अटक करण्यात येईल, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. ही घटना गर्दी व्यवस्थापनासमोरील मोठे आव्हान अधोरेखित करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande