
रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : येथील नित्या प्राणिक हीलिंग सेंटरतर्फे येत्या ४ आणि ५ एप्रिल रोजी मोफत उपचार शिबिर रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे.
प्राणिक हिलिंग ही प्राणशक्तीवर आधारित ऊर्जा उपचार पद्धती आहे. ही शरीराला कुठेही हात न लावता देण्यात येणारी शास्त्रशुद्ध उपचार पद्धत आहे. जगभरातील १४० देशांमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत असलेली व संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली उपचारपद्धती आहे. याबद्दल माहिती सत्र घेण्यात येणार आहे. साधे आजार, गंभीर आजार, पोटाचे विकार, मानसिक आजार, लहान मुलाचे आजार, नातेसंबंधांमधील तणाव यावर उपचार केले जातात.
याबद्दल अधिक माहितीसाठी रत्नागिरीत ४ आणि ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११.३०, दुपारी १२.०० ते १.३०, दुपारी ३ ते ४.३०, संध्याकाळी ५.०० ते ६.३० या प्रत्येकी दीड तासांच्या विविध सत्रांमध्ये माहिती दिली जाईल.
नावनोंदणीसाठी ७७३८७७५५०२ या क्रमांकावर संपर्क साधावा. ००१, तळमजला , केके टॉवर, मारुती मंदिरजवळ, जोगळेकर संकुलासमोर, अतिथी हॉटेलच्या बाजूला, दामले विद्यालय मार्ग, रत्नागिरी येथे हे शिबिर होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी