
रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : देश पातळीवर ‘वाल्मीकी रामायण’ या विषयावर ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. समाजातील सर्व स्तरांपर्यंत रामायण पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
या स्पर्धेत विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामान्य नागरिक, विविध संस्थांचे कार्यकर्ते असे रामायण विषयाचा अभ्यास करू इच्छिणारे सर्वजण भाग घेऊ शकतात. स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे.
स्पर्धेत बहुपर्यायी (MCQ) प्रकारचे २० प्रश्न दिले जातील. त्यातील योग्य पर्याय निवडायचा असेल. ही १५ मिनिटांची ऑनलाइन परीक्षा असेल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरून नोंदणी अर्ज भरावा. ही लिंक अशी - https://onlineexam.sanskrutisamvardhan.org/
नोंदणी करताना मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती यापैकी इच्छित भाषा निवडावी. यशस्वी नोंदणीनंतर १९ एप्रिल ते ३ मे या कालावधीतील आपल्याला सोयीचा दिवस निवडावा. नोंदणीची पोच एसएमएस, ईमेलद्वारे मिळेल.निवडलेल्या दिवशी पुन्हा लिंकर क्लिक करून परीक्षा देता येईल.
नोंदणी झाल्यानंतर स्पर्धकांना त्यांच्या निवडलेल्या भाषेत वाल्मीकी रामायण विषयावरील १००० प्रश्न-उत्तरांचा संच पाठवण्यात येईल. त्यासोबत स्वतःही अभ्यास करता येईल.
परीक्षा पूर्ण होताच तत्काळ निकाल दिसेल. गुणांनुसार प्रमाणपत्रही मिळेल. सर्व यशस्वी स्पर्धकांचा विशेष सत्कार करण्यात येईल.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यांना लिंकविषयीची माहिती द्यावा. आपल्या संपर्कातील शाळांमध्ये माहिती द्यावी. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना देण्यासाठी पत्रके वितरित करावीत. शाळेच्या सूचनाफलकावर पत्रक लावावे. विविध व्हॉट्स अॅप ग्रुप्स व सोशल मीडियावर दर ३-४ दिवसांनी स्पर्धेची माहिती पाठवावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी