
नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते करुणा, नम्रता आणि मानवतेसाठी अखंड सेवाभावाचे मूर्तिमंत रूप म्हणून लोकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. स्वामीजींनी आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या उत्थानासाठी समर्पित केले. खरे मोठेपण हे दुसऱ्यांच्या सेवेतच असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अतुलनीय असून समाजावर त्याचा कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे, असे मोदी यांनी नमूद केले. शिक्षण, सामाजिक कल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे समाजावर दीर्घकालीन ठसा उमटला आहे. आजही त्यांचे जीवन असंख्य व्यक्तींना निःस्वार्थीपणा आणि सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केलेल्या संदेशात म्हणाले की, “त्यांच्या जयंतीनिमित्त परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांना अभिवादन. ते करुणा, नम्रता आणि मानवतेसाठी अखंड सेवाभावाचे प्रतीक म्हणून सामूहिक लोकांच्या कायम स्मरणात राहतील. इतरांच्या उन्नतीसाठी समर्पित आयुष्य जगून त्यांनी दाखवून दिले की खरे महानत्व हे इतरांची सेवा करण्यात आहे. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे समाजावर दीर्घकालीन ठसा उमटला आहे. आजही त्यांचे जीवन असंख्य लोकांना निःस्वार्थीपणा आणि सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.”
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ही श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
'एक्स वर पोस्ट केलेल्या एका संदेशात शाह म्हणाले की, श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जयंतीनिमित्त, अशा एका थोर महात्म्याला मी विनम्र अभिवादन करतो, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य करुणा आणि शिक्षणासाठी समर्पित केले. त्यांच्या दैवी कृपेच्या आशीर्वादाने असंख्य लोकांच्या जीवनाचा कायापालट केला आहे. सिद्धगंगा मठाचा त्यांचा वारसा आपल्याला निस्वार्थपणे सेवा करण्याची प्रेरणा देत राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule