मुंबई विमानतळावर 37 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड, 24 महिला अटकेत
मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)।मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत राजस्व गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने 24 महिलांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण 29.37 किलो सोने जप्त करण्यात आले
मुंबई विमानतळावर 37 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड, 24 महिला अटकेत


मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.)।मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत राजस्व गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने 24 महिलांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण 29.37 किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 37.74 कोटी रुपये आहे.

डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, केनियातील नैरोबी येथून येणाऱ्या काही महिला आपल्या सोबत सोने लपवून आणत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर नैरोबीहून मुंबईत आलेल्या 24 विदेशी महिलांना अडवण्यात आले. तपासणीदरम्यान त्यांच्या बॅग आणि कपड्यांमधून 25.10 किलो सोन्याच्या विटा तसेच 4.27 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने बुधवारी ‘ऑपरेशन धाहाबू ब्लिट्झ’ अंतर्गत केली. मुंबई विमानतळावर यावर्षी झालेल्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी ही एक मानली जात आहे. विशेष म्हणजे ‘धाहाबू’ हा स्वाहिली भाषेत ‘सोने’ या अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे.

आतापर्यंतच्या तपासात असेही समोर आले आहे की, या महिलांना सोने लपवण्याचे आणि सुरक्षा तपासणीतून बचाव करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. यावरून या प्रकरणामागे मोठा तस्करी गिरोह कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित नेटवर्कचे धागेदोरे शोधण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande