अमरावती जिल्ह्यातील 68 ग्रापं. पोटनिवडणुकीच्या शेवटच्या दिवशी 102 नामांकन दाखल
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) | जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींमधीलरिक्त सरपंच व सदस्यपदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजीनामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १०२ नामांकन दाखल झाले आहेत. यामध्ये
जिल्ह्यातील 68 ग्रापं. निवडणूक शेवटच्या दिवशी 102 नामांकन दाखल


अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) | जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींमधीलरिक्त सरपंच व सदस्यपदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजीनामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १०२ नामांकन दाखल झाले आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी ३४ तर सदस्यांकरिता ६८ नामांकन प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या अर्जाची बुधवारी छाननी केली जाणार आहे. १७ एप्रिलपर्यंत उमेदवारांना नामांकन मागे घेता येणार आहे.

जिल्ह्यात ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त असलेल्या पदांसाठी ही निवडणूक घेतली जात आहे. अंतिम मतदार यादी २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची प्रतीक्षा होती. अखेर जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदांसाठी ११ तर सदस्यांच्या ९८ पदांकरिता पोटनिवडणूक लावण्यात आली आहे. यामध्ये सदस्यांमध्ये अनुसूचित जमातींची ६०, सर्वसाधारण २२, अनुसूचित जाती १४ तर नामाप्र २ पदांचा समावेश आहे. सरपंच पदांमध्ये अनुसूचित जमाती ५, अनुसूचित जाती १, नामाप्र २ आणि खुल्या गटातील ३ पदे रिक्त आहेत. याकरिता ७ ते १३ एप्रिल दरम्यान तालुकास्तरावर नामांकन स्वीकारण्यात आले आहेत. या दरम्यान १०२ नामांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये सरपंच पदाकरिता ३४ तर सदस्यांकरिता ६८ नामांकनप्राप्त झाले आहे. या नामांकन अर्जाची बुधवारी छाननी होणार आहे. १७ एप्रिलपर्यंत उमेदवारांना नामांकन मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande