बीड जात पडताळणी समितीचा विक्रमी निकाल; वर्षभरात २४,८६५ अर्जांचा निपटारा
बीड, 15 एप्रिल (हिं.स.)।बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने काम करत २४ हजार ८६५ अर्ज निकाली काढले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त ६३० विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणप
बीड जात पडताळणी समितीचा विक्रमी निकाल; वर्षभरात २४,८६५ अर्जांचा निपटारा


बीड, 15 एप्रिल (हिं.स.)।बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने काम करत २४ हजार ८६५ अर्ज निकाली काढले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त ६३० विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शासकीय योजनांसाठी ही प्रमाणपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. समितीने तांत्रिक बाबींची पूर्तता करत हजारो विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे.

जिल्हा जात पडताळणी समितीने आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटींची वेळेत पूर्तता करावी जेणेकरून प्रमाणपत्र मिळणे सुलभ होईल. या निर्णयामुळे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवेश प्रक्रियेत होणारी अडचण दूर झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande