रेल्वेत 'डिजिटल अवेअरनेस डे' कॅशलेस व्यवहारांसाठी प्रवाशांमध्ये जनजागृती
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल (हिं.स.)।दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विविध रेल्वे स्थानकांवर डिजिटल पेमेंटचा प्रसार करण्यासाठी ''डिजिटल अवेअरनेस डे'' अंतर्गत स्टॉल लावून प्रवाशांना माहिती देण्यात आली.दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागाद्वारे विविध रेल्वे स्थ
रेल्वेत 'डिजिटल अवेअरनेस डे' कॅशलेस व्यवहारांसाठी प्रवाशांमध्ये जनजागृती


छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल (हिं.स.)।दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विविध रेल्वे स्थानकांवर डिजिटल पेमेंटचा प्रसार करण्यासाठी 'डिजिटल अवेअरनेस डे' अंतर्गत स्टॉल लावून प्रवाशांना माहिती देण्यात आली.दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागाद्वारे विविध रेल्वे स्थानकांवर डिजिटल पेमेंटचा प्रसार करण्यासाठी 'डिजिटल अवेअरनेस डे' साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या 'डिजिटल इंडिया' संकल्पनेला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित व सोयीस्कर व्यवहारांची सवय लागावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

दक्षिण मध्य रेल्वेतर्फे या मोहिमेअंतर्गत नांदेडसह परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम, आदिलाबाद आणि इतर प्रमुख स्थानकांवर विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी डिजिटल जनजागृती रॅली काढून प्रवाशांना तिकीट खरेदी व इतर सेवांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे आवाहन केले. संपूर्ण मोहिमेदरम्यान ५०० हून अधिक प्रवाशांना आयआरसीटीसी रेल, रेलवन, भीम यूपीआय ऍप्स आणि क्यूआर कोड आधारित तिकीट प्रणालीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल पेमेंटमुळे प्रवाशांना लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही, व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि रोख रक्कम बाळगण्याची जोखीमही कमी होईल.

डेक्कन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर विशेष 'हेल्प डेस्क' उभारण्यात आले होते. या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि स्थानकांवरील डिजिटल पेमेंट पर्यायांची प्रत्यक्ष माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande