पुणे विमानतळावरून आता तिरुपतीसाठी नवीन फ्लाइट सेवा होणार सुरू
पुणे, 15 एप्रिल, (हिं.स.)। पुणे विमानतळावरून आता तिरुपतीसाठी नवीन फ्लाइट सेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाकडून 15 अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्स मंजूर करण्यात आले आहेत. याम
Air Plane


पुणे, 15 एप्रिल, (हिं.स.)। पुणे विमानतळावरून आता तिरुपतीसाठी नवीन फ्लाइट सेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाकडून 15 अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्स मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या 220 वरून 235 झाली आहे. या निर्णयामुळे पुणे शहराची तिरुपती, मंगळुरू आणि बागडोगरा यांसारख्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे ते तिरुपती हा प्रवास आता सोलापूरमार्गे होणार आहे. हा नवीन रूट असा असेल: पुणे – सोलापूर – तिरुपती. ही सेवा स्टार एअर (Star Air) कडून सुरू करण्यात येणार आहे.सध्या कनेक्टिंग फ्लाइट्सचे तिकीट 3,500 रुपये ते 7,500 रुपयांच्या दरम्यान आहे. ही फ्लाइट सेवा UDAN (उडान - उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत सुरू होत आहे. यामुळे छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्याचा उद्देश साध्य होणार आहे. थोडक्यात पुणेकरांसाठी तिरुपतीचा प्रवास आता अधिक सोपा, वेगवान आणि किफायतशीर होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande