लातूरच्या बाजारात फळांची आवक वाढली
लातूर, 15 एप्रिल, (हिं.स.)। गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारपेठेत रसाळ फळांची मागणी वाढली आहे. बाजारात टरबूज, खरबूज, द्राक्ष, संत्री, अननस, आंबे आदी फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, आवक वाढूनही मागणीमुळे दर मात्र वाढ
फळांचे आगमन


लातूर, 15 एप्रिल, (हिं.स.)। गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारपेठेत रसाळ फळांची मागणी वाढली आहे. बाजारात टरबूज, खरबूज, द्राक्ष, संत्री, अननस, आंबे आदी फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, आवक वाढूनही मागणीमुळे दर मात्र वाढले आहेत.

यामुळे उसाच्या रसाबरोबरच विविध फळांच्या ज्युसलाही मागणी वाढली आहे. त्या तुलनते चिकू, पपई, सफरचंद, केळी या फळांना जेमतेम मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सागीतले. सफरचंद, चिकू यांचे दर बाजारात स्थिर आहेत. तर अननस, टरबूज, खरबुजांची नगाप्रमाणे विक्री होत आहे. अननस ३० ते ५० रुपये तर टरबूज २० ते ३० रुपये नगाने बाजारात मिळत आहे. तसेच किरकोळ बाजारात आंब्याची मोठ्या प्रमाणात रेलचेल होत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ बाजारात द्राक्ष ५० ते ६० रुपयात किलो मिळत आहेत. तर टरबूज २० ते ३० रूपये, डाळीम ५० ते ७० रुपये, आंबे १०० ते २५० रूपये किलो, पपई ३० रुपये, चिकू ७० ते ८० रुपये, संत्री ३० ते ५० रुपये, सफरचंद १५० ते २०० रुपये दराने बाजारात विक्री केला जात आहे.

उन्हाळा सरत आला की बाजारात फळांच्या राजाची आवक होण्यास सुरूवात होते. मागील काही दिवसांपासून शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. बाजारात दररोज जवळपास २०० ते ३५० पेटी आंब्याची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले तसेच शहरातील विविध भागात तसेच चौका-चौकात फळ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या दुकानावर मोठ्या प्रमाणावर आंब्यांची विक्री केली जात आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केशर आंब्याला मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फळांच्या हंगामाला मोठ्या प्रमाणात सुरवात होत असते. सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत कंलिगड, टरबूज त्याचबरोबर आंबे दाखल झाली असून, याला ग्राहकांकडून अधिक मागणी आहे. थंडीची लाट ओसल्यानंतर आता उन्हाचे चटके बसू लागले आहे. उन्हाचापारा देखील दिचसेंदिवस हळूहळू वाढत चालला आहे. यामुळे नागरिकांची लाहीलाही होण्यास सुरवात झाल्याने आता खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरु झाल्याचे चित्र आहे.

वाढत्या उन्हापासून बचाव व्हावा म्हणून नागरिकांकडून रसाळ व थंडगार पेयाला पसंती दिली जात आहे. शरीराला थंडावा देणारी कंलिगडे बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, त्यांना ग्राहक पसंती देत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फळ बाजारात मुबलक रसाळ फळे दाखल होण्यास सुरवातही झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande