
चेन्नई, 15 एप्रिल (हिं.स.)आयपीएल २०२६ चे आतापर्यंत बावीस सामने खेळले गेले आहेत. या काळात, पाच संघांच्या कर्णधारांना धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. असे एकूण सहा वेळा घडले आहे. यातील सर्वात नवीन नाव कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे आहे. १४ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल त्याचा संघ दोषी आढळला. या हंगामातील केकेआरचा हा पहिलाच गुन्हा आहे. रहाणेला १2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
रहाणेच्या आधी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड, गुजरात टायटन्सचा शुभमन गिल आणि पंजाब किंग्सचा श्रेयस अय्यर यांना धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये दोनदा दंड ठोठावण्यात आलेला अय्यर हा एकमेव कर्णधार आहे. त्याला १ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध आणि त्यानंतर ३ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यांदरम्यान धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. आयपीएलने ९ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला दंड ठोठावला. चेन्नईचा कर्णधार गायकवाडला ११ एप्रिल रोजी दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी दंड ठोठावण्यात आला. १२ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर हार्दिकला शिक्षा झाली.
आयपीएल २०२६ च्या सामन्यांमध्ये धीम्या गतीने खेळ करण्याचे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. १२ एप्रिल रोजी मुंबई आणि बंगळूर यांच्यातील सामना चार तास २१ मिनिटे चालला, ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब सामन्यांपैकी एक ठरला. यामुळे टी-२० सामन्याच्या कालावधीबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीसीसीआय कोणती पावले उचलत आहे? यापूर्वी, दोनपेक्षा जास्त सामन्यांमध्ये धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल कर्णधाराला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. पण बीसीसीआयने आयपीएलमधून हा नियम काढून टाकला आहे. आता केवळ आर्थिक दंड आकारला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे