जळगावमध्ये घरफोडी; १० लाखांहून अधिक रोकडसह १२ लाखांचे दागिने लंपास
जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये एका व्यावसायिकाच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी सुमारे ₹१० लाख १२ हजारा
जळगावमध्ये घरफोडी; १० लाखांहून अधिक रोकडसह १२ लाखांचे दागिने लंपास


जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये एका व्यावसायिकाच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेत चोरट्यांनी सुमारे ₹१० लाख १२ हजारांची रोकड तसेच अंदाजे ₹१२ लाख १३ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण मोठा ऐवज चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना जळगावच्या कुसुंबा खुर्द परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये घडली. व्यावसायिक मोईज अब्बास बोहरा यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही घरफोडी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोईज बोहरा हे कुटुंबासह बऱ्हाणपूरला गेले असताना १३ एप्रिल रोजी घर बंद होते. काही दिवसांनी परतल्यानंतर त्यांना घराच्या वरच्या मजल्याचा दरवाजा अर्धवट उघडा आणि कुलूप तुटलेले आढळले. आत प्रवेश केल्यानंतर कपाटांचे लॉकर तोडलेले असून सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून रोकड, सोन्याचे ब्रासलेट, अंगठ्या आणि बांगड्या असा ऐवज लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मोईज बोहरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande