वाकोल्यातून 63 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू
ठाणे, 17 एप्रिल, (हिं.स.)। सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला परिसरातून मंगला मंगेश राठोड (वय 63) या ज्येष्ठ महिला राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना घडली असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस आणि कुटुंबीयांनी नागरिकांना मदतीचे आवाहन क
वाकोल्यातून 63 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू


ठाणे, 17 एप्रिल, (हिं.स.)। सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला परिसरातून मंगला मंगेश राठोड (वय 63) या ज्येष्ठ महिला राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना घडली असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस आणि कुटुंबीयांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. ही घटना 3 मार्च 2026 रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात हरवलेली व्यक्ती वही नोंद क्रमांक 42/26 नुसार नोंद करण्यात आली असून पोलीस सर्व स्तरावर तपास चक्रावून शोध घेत आहेत.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती मंगला राठोड यांनी 3 मार्च रोजी पहाटे विरार स्थानकावरून ५:३४ ची बोरीवली स्लो ट्रेन पकडली होती. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या बोरीवलीच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, विरार ते बोरीवली दरम्यान प्रवास करत असताना त्यांना कोणीतरी अनोळखी व्यक्ती रेल्वेतून उतरवून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये अस्पष्टपणे दिसून आले आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून कुटुंबीयांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

घटनेच्या वेळी मंगला राठोड यांनी पांढऱ्या रंगाचे हुडी असलेले जॅकेट परिधान केले होते. 9बी/06, भोसले नगर, हनुमान मंदिराजवळ, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व) येथे राहणाऱ्या या महिलेबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा त्या कुठे आढळल्यास त्वरित वाकोला पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी अधिक माहितीसाठी ९८३३५६३००४, ९८३३२०४६४३ किंवा ९१२२२६६८३२५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande