आंध्रातील NDPS गुन्ह्यात 12 वर्षांपासून फरार दोन आरोपी अमरावतीत जेरबंद
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) अमरावती शहरात मोठी कारवाई करत गुन्हे शाखा आणि आंध्र प्रदेशातील नार्कोटिक्स सेलने संयुक्त मोहिमेत सन 2014 पासून फरार असलेल्या NDPS गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले. दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ही मो
NDPS गुन्ह्यात 12 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; दोन आरोपी आंध्र प्रदेश पोलिसांच्या ताब्यात


अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.)

अमरावती शहरात मोठी कारवाई करत गुन्हे शाखा आणि आंध्र प्रदेशातील नार्कोटिक्स सेलने संयुक्त मोहिमेत सन 2014 पासून फरार असलेल्या NDPS गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले. दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ही मोहीम राबविण्यात आली.चित्तूर (आंध्र प्रदेश) येथील नार्कोटिक्स सेलने अमरावती पोलीस आयुक्तांकडे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी मदत मागितली होती. न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध गैरजामीन वॉरंट जारी केले होते. त्यानुसार अमरावती गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली.या कारवाईत अफसर खान, शेख राजू, महेश साहू, शेख शहजाद उर्फ साजिद आणि अकरम शहा उर्फ बब्बा यांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी तीन आरोपींना न्यायालयीन पडताळणीनंतर नोटीस देऊन सोडण्यात आले, तर दोन मुख्य आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी आंध्र प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या यशस्वी कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या NDPS प्रकरणाला गती मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande