
नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.) : नाशिकच्या टीसीएसमधील अवैध धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या प्रकरणांमधील आरोपी निदा खान हिच्या जामीन अर्जावर नाशिक रोड न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज दाखल करून घेतला असून पुढील सुनावणी सोमवारी होणार असल्याची माहिती तिचे वकील ऍड. राहुल कासलीवाल यांनी दिली.
नाशिकमधील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय आयटी कंपनी टीसीएसमध्ये घडलेल्या या प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेल्या निदा खान हिने वकील राहुल कासलीवाल यांच्या मार्फत नाशिक रोड न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. शनिवारी हा अर्ज सुनावणीसाठी न्यायालयासमोर आला असता न्यायालयाने तो ग्राह्य धरत पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली.
आता सोमवारी सकाळी नाशिक रोड न्यायालयात या जामीन अर्जावर सविस्तर सुनावणी होणार आहे. यावेळी आरोपी व पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालय कोणता निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV