नाशिक : टीसीएस प्रकरणी तपासात धक्कादायक माहिती पुढे आली
टीसीएसचे इतर कर्मचारी देखील चौकशीच्या कक्षेत येणार नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.) : नाशिकच्या टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील लैंगिक शोषण आणि अवैध धर्मांतर प्रकरणी पोलिसांच्यातपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी आरोपींच्या मो
Officers and employees of other


टीसीएसचे इतर कर्मचारी देखील चौकशीच्या कक्षेत येणार

नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.) : नाशिकच्या टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील लैंगिक शोषण आणि अवैध धर्मांतर प्रकरणी पोलिसांच्यातपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून हाती आलेल्या माहितीमुळे टीसीएसचे इतर अधिकारी आणिकर्मचारी देखील चौकशीच्या कक्षेत येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय.

नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील टीसीएस कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या एकूण 9 तक्रारी पोलीस आयुक्तांकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महिला पोलिसांचे विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने माहिती गोळा करत प्रकरणी पहिला गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात, तर इतर गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंदवले गेले.

देवळाली कॅम्प येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ऍट्रॉसिटी कायद्याचाही समावेश झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) संयुक्तपणे सुरू आहे. मोबाईल तपासणीतून समोर आलेल्या माहितीप्रमाणे, आरोपींकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विशिष्ट पद्धतीने संवाद साधला जात असल्याचे दिसून आले आहे. या तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वापर झाला असण्याची शक्यता एटीएसने वर्तवली असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला असून, संबंधित कर्मचाऱ्यांनी इतर आयटी कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशीही संपर्क साधल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यामुळे येत्या काळात इतर कंपन्यांतील व्यक्तींवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande