भोंदू अशोक खरात प्रकरणाला एक महिना पूर्ण, आश्रय दाते अजूनही गुलदस्त्यात
नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.)। - भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून अजूनही पोलीस या प्रकरणातील आश्रय दाते कोण या पर्यंत पोहोचलेले नाहीत, पण आत्तापर्यंत हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे साम्राज्य पोलिसांनी समोर आणले आह
One month has passed since


नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.)।

- भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून अजूनही पोलीस या प्रकरणातील आश्रय दाते कोण या पर्यंत पोहोचलेले नाहीत, पण आत्तापर्यंत हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे साम्राज्य पोलिसांनी समोर आणले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये खरात याला आतापर्यंत चार प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली असून पाचव्या प्रकरणामध्ये पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

भोंदू बाबा म्हणून समोर आलेल्या अशोक खरात याचे प्रकरण मागील महिन्यामध्ये 17 मार्च रोजी समोर आलेले होते यापूर्वी घरात याचे अनेक राजकीय नेत्यांबरोबर तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर संबंध होते त्यांच्या परिवाराशी संबंध होते आणि काही विशिष्ट मोठ्या घरातील महिलांचा लैंगिक छळ केल्याचे देखील केल्याचे समोर आलेले आहे हे सर्व घडत असताना आत्तापर्यंत अशोक खरात याला कोण आश्रय देत होतं हे मात्र समोर आलेल्या नाही अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर आली परंतु खरं कोण हे मात्र अजून एक गुलदस्त्यात आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे खरात बरोबर असलेले संबंध स्पष्ट झाल्यामुळे त्यांची मात्र या प्रकरणात विकेट पडली आहे. यानंतर अनेक नावं समोर आली परंतु प्रत्यक्षात मात्र कोणीही सत्तेपासून दूर गेलेल्या नाही किंवा कुठलाही अधिकारी कारवाईला समोर आलेला नाही.

हे सर्व घडत असताना आत्तापर्यंत खरात विरोधात नाशिक अहिल्यानगर व इतर भागांमध्ये सोळा गुन्हे दाखल झालेले आहेत नऊ गुन्हे हे लैंगिक छळाचे आहेत तर अन्य हे फसवणुकीचे आहेत. आतापर्यंत 58 वेगवेगळ्या क्लिप्स समोर आलेले आहेत. भोंदू बाबा अशोक खरात हा महिलांना इलेक्ट्रिकल साप यासह कस्तुरी व दुर्मिळ वनस्पतींचा वापर करून लैंगिक खेळ करत असल्याचे समोर आलेले आहे

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हणून 20 मार्च रोजी महिला आयपीएस अधिकारी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसटी म्हणजे विशेष पोलीस तपास पथकाची स्थापना करण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तर 13 एप्रिल रोजी या सर्व प्रकरणांमध्ये ईडीची देखील इंट्री झाली खरात प्रकरणांमध्ये एकूण नाशिक पुणे अहिल्यानगर अशा 11 ठिकाणी छापे मारे केली आणि त्यातून सुमारे एक हजार कोटी रुपयांची मालमत्ता ही समोर आलेली आहे उर्वरित 3000 कोटींच्या मालमत्ता संदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे लवकरच त्यावरती देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत या प्रकरणांमध्ये शिवनिका ट्रस्टची देखील चौकशी करण्यात आली असून लवकरच अजून काही गोष्टी समोर येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी चार गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला असून चारही गुणांमध्ये घरात याला न्यायालयीन कोठेही दिल्यास आलेली आहे तर पाचव्या गुणाच्या तपासासाठी रविवारी 19 एप्रिल रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे त्यानंतर पाचव्या गुन्ह्याचा तपास हा सुरू केला जाईल या सर्व प्रकरणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लक्ष ठेवून असून शनिवारी त्यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या बैठकीत या सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन कारवाई गतिमान करण्याचे आदेश दिले आहेत असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande