महिला आरक्षण विधेयक नामंजूर, हा लोकशाहीसाठी दु:खाचा दिवस - प्रियांका चतुर्वेदी
मुंबई, १८ एप्रिल (हिं.स.) : महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दु:खाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे. ज्या महिलांना संसदेत किंवा विधानसभेवर निवडून जाण्याची
प्रियांका चतुर्वेदी


मुंबई, १८ एप्रिल (हिं.स.) : महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दु:खाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे. ज्या महिलांना संसदेत किंवा विधानसभेवर निवडून जाण्याची इच्छा होती, त्यांच्यासाठी महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे दु:खद बाब असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान त्यांच्या या पक्षविरोधी भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर पक्षाच्या विरोधात जाऊन विधेयकाचे समर्थन करणारी भूमिका घेतली. त्यांनी हे विधेयक मंजूर न झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.

माझी भूमिका सातत्याने महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने राहिली आहे आणि मी या मुद्द्यावर आवाज उठवतच राहीन. मी स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही जर तुम्हाला मी जशी आहे तसा पचनी पडत नसेल, तर तो तुमचा प्रश्न आहे‌.

प्रियांका चतुर्वेदी यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात त्या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन नव्या पक्षात जाणार का, अशी चर्चा होऊ लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande