
श्रीनगर, 19 एप्रिल (हिं.स.)।जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (१९ एप्रिल) एका अमेरिकन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले, कारण अधिकाऱ्यांना त्याच्याकडे सॅटेलाइट फोन आढळून आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची ओळख जेफरी स्कॉट प्राथर अशी झाली असून तो अमेरिकेतील मोंटाना येथील रहिवासी आहे. नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान त्याला थांबवण्यात आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले.
काश्मीरमध्ये सॅटेलाइट फोनच्या वापरासंदर्भात कडक नियम लागू आहेत आणि पूर्वपरवानगीशिवाय तो जवळ बाळगण्यास बंदी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्यासोबत कोलकाता येथील एक स्थानिक व्यक्तीही होती. त्याची ओळख हलदर कौशिक अशी झाली असून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या प्रवासाचा उद्देश काय होता आणि त्या उपकरणाचा वापर कशासाठी केला जात होता, याबाबत पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode