'संघ गंगेचे तीन भागीरथ' नाटक २१ एप्रिलला दिल्लीतील दिलशाद गार्डन येथे होणार सादर
नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा.स्व. संघ) शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, ''संघ गंगा के तीन भागीरथ'' (संघ गंगेचे तीन भागीरथ) नावाचे एक विशेष हिंदी नाटक २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दिल्लीतील दिलशाद गार्डन येथे अ
संघ गंगा के तीन भगीरथ हिंदी नाटक का मंचन


नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा.स्व. संघ) शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, 'संघ गंगा के तीन भागीरथ' (संघ गंगेचे तीन भागीरथ) नावाचे एक विशेष हिंदी नाटक २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दिल्लीतील दिलशाद गार्डन येथे असलेल्या 'अर्वाचीन इंटरनॅशनल स्कूल'मध्ये सादर केले जाणार आहे, अशी माहिती नाटकाचे दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी दिली.

पेंडसे यांनी हिंदुस्थान समाचारला सांगितले की, संघाने १०० वर्षे पूर्ण केल्याच्या या प्रसंगी, हे नाटक संपूर्ण देशभरात सादर केले जात आहे. 'संघ गंगा के तीन भागीरथ' हे नाटक संघाचे पहिले तीन सरसंघचालक - डॉ. केशव बळीराम हेडगेवार, माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) आणि बाळासाहेब देवरस यांचे जीवनकार्य आणि योगदानावर आधारित आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या नाटकाच्या माध्यमातून संघाचा शतकाचा प्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पेंडसे यांनी नमूद केले की, यापूर्वी १५ आणि १८ एप्रिल रोजी दिल्लीतील विविध ठिकाणी हे नाटक सादर करण्यात आले होते. त्यांनी पुढे माहिती दिली की, आज संध्याकाळी ६ वाजता 'श्यामा प्रसाद मुखर्जी कॉलेज'मध्ये हे नाटक सादर करण्यात आले. यानंतर, २१ एप्रिल व्यतिरिक्त, २२, २४, २५, २६ आणि २८ एप्रिल रोजी दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी हे नाटक सादर करण्याची योजना आहे.

दिल्लीमध्ये नाटक कधी आणि कुठे होणार सादर

- २१ एप्रिल : सायं. ६ वाजता, अर्वाचीन इंटरनॅशनल स्कूल, दिलशाद गार्डन.

- २२ एप्रिल : सायं. ४ वाजता, एलटीडी सभागृह, मंडी हाऊस.

- २४ एप्रिल : सायं. ६ वाजता, द्वारका सेक्टर ३.

- २५ एप्रिल : सायं. ६ वाजता, एआईसीटीई, नेल्सन मंडेला मार्ग, वसंत कुंज.

- २६ एप्रिल : सकाळी ९ वाजता, सत्यवती कॉलेज, अशोक विहार.

- २६ एप्रिल : सायं. ५:३० वाजता, कमला नेहरू कॉलेज. - 28 एप्रिल : संध्याकाळी 6, शहीद सुखदेव कॉलेज, सेक्टर-11, रोहिणी.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande