दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग भारत दौऱ्यासाठी रवाना
नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.)।दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग रविवारी भारत दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ आणि पुरवठा साखळीवर दबाव वाढत असताना हा दौरा होत आहे. राष्ट्राध्यक्ष ली आ
South Korean President Lee Jae-myung leaves for India visit


नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.)।दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग रविवारी भारत दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ आणि पुरवठा साखळीवर दबाव वाढत असताना हा दौरा होत आहे. राष्ट्राध्यक्ष ली आज नवी दिल्लीत पोहोचणार असून सोमवारी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत.

अलीकडील काळातील या दोन्ही नेत्यांची ही तिसरी प्रत्यक्ष भेट ठरणार आहे. यापूर्वी ते जी ७ आणि जी २०. सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भेटले होते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः जहाजबांधणी उद्योग, सागरी उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर राहणार आहे. तसेच, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे ऊर्जा पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी दोन्ही देश संयुक्त रणनीती आखू शकतात. भारत दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष ली एका व्यावसायिक परिषदेतही सहभागी होऊ शकतात. येथे ते कोरियन कंपन्यांसाठी नवीन गुंतवणूक आणि व्यापाराच्या संधींचा शोध घेतील. इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन उद्योगातील दक्षिण कोरियन कंपन्यांसाठी भारत हा मोठी बाजारपेठ आणि उत्पादन केंद्र मानला जातो.

भारत दौऱ्यानंतर राष्ट्राध्यक्ष ली हनोई (व्हिएतनाम) येथे जाणार आहेत. तेथे ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टो लाम आणि इतर नेत्यांची भेट घेतील. या भेटीत ऊर्जा पुरवठा, महत्त्वाची खनिजे आणि आर्थिक सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. हा ली यांचा व्हिएतनामचा पहिला अधिकृत दौरा असेल. तसेच नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्याही परदेशी नेत्याचा हा पहिला मोठा दौरा मानला जात आहे.या संपूर्ण दौऱ्याचा उद्देश वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांशी संबंध अधिक मजबूत करणे आणि दक्षिण कोरियाचा जागतिक राजनैतिक प्रभाव वाढवणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande