उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची घेतली भेट
कोलंबो/नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.)। उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी श्रीलंकेच्या आपल्या पहिल्या द्विपक्षीय अधिकृत दौऱ्यादरम्यान कोलंबो येथील राष्ट्रपती सचिवालयात राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके आणि पंतप्रधान डॉ. हरिणी अमरसूर्या य
VP Radhakrishnan Meets Sri Lankan President and PM


VP Radhakrishnan Meets Sri Lankan President and PM


कोलंबो/नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.)। उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी श्रीलंकेच्या आपल्या पहिल्या द्विपक्षीय अधिकृत दौऱ्यादरम्यान कोलंबो येथील राष्ट्रपती सचिवालयात राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके आणि पंतप्रधान डॉ. हरिणी अमरसूर्या यांची भेट घेतली. श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ पंतप्रधान निवास ‘टेंपल ट्रीज’ येथे भोजनाचे आयोजन केले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दरम्यान दोन्ही नेत्यांनी सामायिक इतिहास आणि मजबूत सांस्कृतिक संबंधांवर आधारित बहुआयामी नातेसंबंध अधिक दृढ करण्याबाबत अर्थपूर्ण चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी शतकानुशतके जुने सांस्कृतिक संबंध आठवले. तसेच द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी तांत्रिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर चर्चा झाली.

चर्चेचा एक मोठा भाग भारतीय गृहनिर्माण प्रकल्प आणि चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे प्रभावित भागांसाठी मंजूर 45 कोटी अमेरिकी डॉलरच्या मदत पॅकेजवर केंद्रित होता. याअंतर्गत भारतीय वंशाच्या तमिळ समुदायाच्या प्रभावित भागांमध्ये पुनर्बांधणी आणि पुनर्वसन प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही बाजूंनी मच्छीमार समुदायांच्या उपजीविकेचा विचार करून त्यांच्या समस्यांचे कायमस्वरूपी समाधान मानवतावादी दृष्टिकोनातून करण्यावर भर दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande