पश्चिम बंगालचे लोक यावेळी ममता यांना धडा शिकवतील - नितिन नवीन
कोलकाता, 19 एप्रिल (हिं.स.)। एक महिला मुख्यमंत्री असूनही ममता दीदींनी महिला आरक्षणाला विरोध केला आहे. पश्चिम बंगालमधील महिला त्यांना धडा शिकवतील. भविष्यात नारी शक्ती वंदन अधिनियम नक्कीच पारित होईल. असे भारतीय जनता पक्ष (भाजप) चे राष्ट्रीय अध्यक्ष न
WB ASSEMBLY ELECTION BJP TMC Nitin Nabin Balurghaa


कोलकाता, 19 एप्रिल (हिं.स.)। एक महिला मुख्यमंत्री असूनही ममता दीदींनी महिला आरक्षणाला विरोध केला आहे. पश्चिम बंगालमधील महिला त्यांना धडा शिकवतील. भविष्यात नारी शक्ती वंदन अधिनियम नक्कीच पारित होईल. असे भारतीय जनता पक्ष (भाजप) चे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन म्हणाले .

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान रविवारी नितिन नवीन यांनी दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालुरघाट येथे रोड शो केला. त्यांनी बालुरघाट विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार विद्युत कुमार रॉय यांच्या समर्थनार्थ मंगलपूर चौक ते थाना चौकापर्यंत रोड शो केला.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर निशाणा साधत म्हटले की, देशात एक आघाडी सक्रिय आहे, आम्ही तिला ‘अँटी-वुमन अलायन्स’ असे म्हणतो. ज्यामुळे महिलांना त्यांचे हक्क मिळाले असते त्या विधेयकाला तृणमूल, काँग्रेस, डीएमके आणि समाजवादी पक्ष यांनी अडवले आहे. त्यांनी महिलांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले आहे. पश्चिम बंगालमधील प्रत्येक व्यक्ती महिलांच्या या अपमानाचा बदला घेईल.

राष्ट्रीय अध्यक्षांनी पुढे सांगितले की, विरोधक सीमांकनाचा बहाणा करत आहेत, पण ते सीमांकन त्यांच्या कारकिर्दीत झाले होते. त्यांना त्यांच्या स्वतःच्या कायद्यांवरच विश्वास नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande