अमरावतीत काँग्रेसला धक्का : सरचिटणीस दिलीप एडतकर यांचा राजीनामा
अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तसेच धनगर समाजाचे नेते ऍड. दिलीप एडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी याबाबतचा ई-मेल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, वर
धनगर समाजाच्या नेत्याने सोडली काँगेसची साथ काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा दिला राजीनामा


अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तसेच धनगर समाजाचे नेते ऍड. दिलीप एडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी याबाबतचा ई-मेल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर आणि वरिष्ठ नेते डॉ. सुनील भाऊ देशमुख यांना पाठविला आहे.

राजीनामा पत्रात ऍड. एडतकर यांनी नमूद केले आहे की, “आपण मला न मागता प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. माझ्या परीने मी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, यापुढे या नाममात्र पदावर राहणे मला शक्य नाही. त्यामुळे माझा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.”

धनगर समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ऍड. एडतकर यांच्या या निर्णयामुळे अमरावतीतील काँग्रेस संघटनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande