नांदेड जिल्ह्यात मुलाच्या विरहात वडिलांनी सोडला प्राण
नांदेड, 02 एप्रिल (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात एक घटना घडली आहे. तालुक्यातील फुलवळ येथील हुसेन काशीमसाब निछलकर (वय ४३) यांचे अल्पशा निधन झाले. मुलाचे निधन झाल्याच्या विरहात अवघ्या चार तासांतच वडील काशीम लालासाब निछलकर (वय ७०) यांचेही निधन झाले. मुला
नांदेड जिल्ह्यात मुलाच्या विरहात वडिलांनी सोडला प्राण


नांदेड, 02 एप्रिल (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात एक घटना घडली आहे. तालुक्यातील फुलवळ येथील हुसेन काशीमसाब निछलकर (वय ४३) यांचे अल्पशा निधन झाले. मुलाचे निधन झाल्याच्या विरहात अवघ्या चार तासांतच वडील काशीम लालासाब निछलकर (वय ७०) यांचेही निधन झाले. मुलापाठोपाठ वडीलही गेल्याने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे. हुसेन निछलकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या आजारावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची प्राणज्योत मावळली. बाप-लेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, भावजय असा परिवार आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande