माढा :शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यावरून वाद
सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मध्यरात्री रातोरात बसवल्यामुळे दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला असून गावात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर प्रशासनाने खबर
Ncgh


सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मध्यरात्री रातोरात बसवल्यामुळे दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला असून गावात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावात कलम १४४ (जमावबंदी) लागू केला आहे.

काही शिवभक्तांनी अज्ञातपणे मध्यरात्री गावातील मुख्य चौकात, खेलोबा देवस्थानच्या जागेत पुतळा उभा केला. एका गटाने या अनधिकृत स्थापनेचा विरोध केला आहे, तर दुसरा गट पुतळा न हटवण्यावर ठाम आहे हिंसक घटना: वादाचे रूपांतर संघर्षात झाल्याने जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि टायर जाळून निषेध व्यक्त केला, ज्यामुळे परिस्थिती हिंसक झाली होती. पुतळा उभारल्याप्रकरणी दत्तात्रय पाटेकर, ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाळ यांच्यासह काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande