सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका; अर्ज 30 एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन
नांदेड, 02 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 83 व 88 अन्वये सहकारी संस्थांच्या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यात येत आहे. यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले (वय 70 वर्षे पूर्ण न झालेले) अधिक
सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका; अर्ज 30 एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन


नांदेड, 02 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 83 व 88 अन्वये सहकारी संस्थांच्या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यात येत आहे. यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले (वय 70 वर्षे पूर्ण न झालेले) अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, वकील तसेच सनदी लेखापाल यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर येथे तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर/धाराशिव/बीड/नांदेड व संबंधित जिल्ह्यांतील सर्व उपनिबंधक व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.

हे अर्ज 01 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्राप्त होऊ शकतात. संबंधित पात्र व्यक्तींनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत संबंधित कार्यालयात सादर करावेत. याबाबतची सविस्तर सूचना संबंधित कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande