पुणे : ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्माचा सचित्र परिचय' पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)। जगभरातील प्रमुख धर्मांची तुलनात्मक मांडणी आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा उलगडा करणाऱ्या, मिलिंद ओक लिखित ''ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्माचा सचित्र परिचय'' (An Illustrated Primer: Christianity, Islam and Hindu Religions -
grf


पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)। जगभरातील प्रमुख धर्मांची तुलनात्मक मांडणी आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा उलगडा करणाऱ्या, मिलिंद ओक लिखित 'ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्माचा सचित्र परिचय' (An Illustrated Primer: Christianity, Islam and Hindu Religions - With Special Reference to Bharat) या पुस्तकाचे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, जागतिक स्तरावरील धार्मिक संस्थांचे अर्थकारण आणि संघटनात्मक रचनेवर यात प्रकाश टाकण्यात आला आहे.

लेखक मिलिंद ओक यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आज जगभरात १२२ देशांमध्ये ख्रिश्चन धर्मीय बहुसंख्य आहेत, तर ५० देशांमध्ये मुस्लिम समाजाची बहुसंख्या आहे. मात्र, हिंदू बहुसंख्या असलेले केवळ दोनच देश आहेत. अशा स्थितीत या तीनही धर्मांची नेमकी तत्त्वज्ञानात्मक भूमिका काय आहे, हे समजून घेणे काळाची गरज आहे. : धर्माच्या प्रसारासाठी विविध धर्मांनी कशा प्रकारे संस्था निर्माण केल्या आहेत.या संस्थांना निधी कोठून मिळतो, त्यांचे अर्थकारण कसे चालते आणि त्यांच्यासाठी लागणारे मनुष्यबळ कसे प्रशिक्षित केले जाते.'नेशन स्टेट' (राष्ट्र-राज्य) संकल्पना आणि त्या आधारावर चालणारे धार्मिक कार्य यांचा सखोल अभ्यास यात मांडला आहे.

डॉ. गोडबोले यांनी या पुस्तकाचे महत्त्व विशद केले.ही केवळ आकड्यांची जंत्री नसून हे पुस्तक म्हणजे सामान्य लोकांना समजणाऱ्या भाषेत मांडणी केलेला उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. अत्यंत कठीण विषय अत्यंत सोप्या भाषेत मांडल्यामुळे अनेकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्म जागरण ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद वाईकर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande