
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूरला बदली
गडचिरोली., 20 एप्रिल (हिं.स.) माओवाद्यांविरोधात जबरदस्त कामगिरी करणारे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापुरच्या पोलिस अधीक्षक पदी बदली झाली आहे. तसेच गडचिरोलीचेच अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश आता गडचिरोलीचे नवे पोलिस अधीक्षक झाले आहेत.माओवाद्यांविरोधात अनेक अभियान यशस्वीपणे पूर्ण करणारे, भूपती व इतर जहाल माओवादी नेत्यांसह अनेक माओवाद्यांना सरकारपुढे शरण आणणारे नीलोत्पल गडचिरोलीत आपल्या शांत स्वभावासाठी व धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध झाले. त्यांच्याच कार्यकाळात अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत एम. रमेश आता गडचिरोलीचे नवे पोलिस अधीक्षक झाले आहेत. त्यांनीही अनेक माओवादविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचीही गडचिरोलीची कारकिर्द यशस्वी राहिल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. माओवाद्यांना जवळ-जवळ संपुष्टात आणणारे नीलोत्पल यांची कारकिर्द गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल हे निश्चित!
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond