
लातूर, 20 एप्रिल (हिं.स.) : उदगीर येथील लाल बहादूर शास्री माध्यमिक विद्यालयात सखी साविञी व महिला तक्रार निवारण समितीची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली.दोन्ही समितीच्या प्रमुखांनी वर्षभरात घेतलेल्या कार्यक्रमांचा व उपक्रमांचा अहवाल थोडक्यात मांडला.आरोग्या संबंधीची जागरूकता, वेशभूषा व केशभूषा याकडे विशेष लक्ष द्यावे.त्यासाठी माता पालकांचा मेळावा घ्यावा असे मतसखी सावित्री समितीचे समुपदेशक संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मुलींच्या आरोग्य तपासणीसाठी आगामी काळात कॅम्प घेऊ.तसेच आहाराविषयीची माहिती देऊ. असे मत महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य डॉ .भारती राठोड यांनी व्यक्त केले.मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेऊन उपाय सुचवू व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करू. असे मत मुख्याध्यापक शैलेश कंगळे यांनी व्यक्त केले.बैठकीचे आभार समिती सदस्य मीनाक्षी कस्तुरे यांनी मानले.यावेळी संकुलाचे स्थानिक कार्यवाह शंकरराव लासूणे, संतोष कुलकर्णी, छाया कुलकर्णी, मुख्याध्यापक शैलेश कंगळे उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर पर्यवेक्षक,किरण नेमट, महिला तक्रार निवारण समितीचे पालक अनिता यलमटे प्रमुख शोभा नेत्रगावकर तसेच सखी सावित्री समितीचे पालक कृष्णा मारावर प्रमुख अनिता मुळखेडे, सहप्रमुख सुरेखा शिंदे, एकनाथ राऊत उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis