सोलापूर: बी-बियाणे अनुदान योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.) शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरूनही महा डीबीटी ऍप/वेबसाईटद्वारे नोंदणी करून अर्ज सादर करू शकतात. तसेच जवळच्या महा-ई सेवा किंवा सीएससी केंद्रामार्फतही अर्ज भरता येतो. नोंदणी करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक व शेतकरी नोंदणी
Maha DBT


सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)

शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरूनही महा डीबीटी ऍप/वेबसाईटद्वारे नोंदणी करून अर्ज सादर करू शकतात. तसेच जवळच्या महा-ई सेवा किंवा सीएससी केंद्रामार्फतही अर्ज भरता येतो. नोंदणी करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक व शेतकरी नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य आहे.

अर्जासाठी ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक खाते तपशील (अनुदान थेट खात्यात जमा होण्यासाठी), मोबाईल क्रमांक तसेच अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. ऑनलाइन अर्जासाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही; मात्र ई-सेवा केंद्रावर नाममात्र सेवा शुल्क लागू होऊ शकते.

निवड प्रक्रिया शासनाच्या निकषांनुसार व उपलब्ध निधीनुसार केली जाते. “प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर अनुदान वाटप केले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची निवड, क्षेत्रफळ व वैयक्तिक माहिती अचूक भरावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. अर्ज सादर केल्यानंतर पावती जतन करून अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासावी. शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande