नाशिक - संशयित निदा खानच्या अटकपूर्व अर्जावर २७ एप्रिलला अंतिम सुनावणी
नाशिक, 20 एप्रिल (हिं.स.)। येथील टीसीएस कंपनीतील महिला सहकाऱ्याचा लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चर्चेत असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी निदा खान हिला तूर्तास दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. नाशिकरोड येथील न्यायालयात सोमवार
Decision on Nida Khan's bail


नाशिक, 20 एप्रिल (हिं.स.)। येथील टीसीएस कंपनीतील महिला सहकाऱ्याचा लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चर्चेत असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी निदा खान हिला तूर्तास दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. नाशिकरोड येथील न्यायालयात सोमवारी झालेल्या 'इन कॅमेरा' सुनावणीनंतर तिचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. आता या प्रकरणावर २७ एप्रिल रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या खळबळजनक गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच दानिश ईजाज शेख (३०, मुंबई नाका) आणि तौसिफ बिलाल अत्तार (३८, अशोका मार्ग) यांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या गुन्ह्यात त्यांना मदत करणारी आणि चिथावणी देणारी संशयित निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिने अटकेपासून वाचण्यासाठी नाशिकरोड येथील न्यायाधीश न्यायमूर्ती केदार जोशी यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.

गर्भवती असल्याचा वैद्यकीय अहवाल सादर

सुनावणीदरम्यान निदा खान हिच्या वकिलांनी ती गर्भवती असल्याचा वैद्यकीय अहवाल सादर केला आणि या मानवी भूमिकेतून तिला जामीन मिळावा, असा जोरदार युक्तीवाद केला. याप्रसंगी सरकारी वकील ॲड किरण बेंडभर आणि पीडितेचे वकील ॲड. मिलिंद कुरकुटे उपस्थित होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळून लावला. न्यायालयाने अंतरिम दिलासा नाकारल्याने निदा खान हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. २७ एप्रिल रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीत सरकार पक्ष आणि बचाव पक्ष आपला अंतिम युक्तीवाद मांडतील. या निकालानंतरच निदा खानला पोलीस अटक करणार की तिला दिलासा मिळणार, हे स्पष्ट होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande