
पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात ‘राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती ने २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन (संलग्न फेडरेशन) देखील सहभागी होणार असल्याने ससून रुग्णालयामधील परिचारिका संपावर जाणार आहेत.
जुन्या निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी करावी, परिचारिकांची रिक्त पदे भरावीत, टयूटर ची पदोन्नती कराव्यात, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे या प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा २१ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत संप सुरू केला जाईल, असा इशारा असोसिएशनच्या पुणे च्या अध्यक्ष प्रज्ञा गायकवाड यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु