वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विद्यापीठाची नियमावली
सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा सध्या सुरु आहे. ३० एप्रिलपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यापीठाने परीक्षा केंद्र
Univerisity Solapur


सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा सध्या सुरु आहे. ३० एप्रिलपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना व परीक्षार्थींनी नेमकी काय काळजी घ्यावी, यासंदर्भातील ‘एसओपी’ तथा नियमावली तयार केली आहे. यात प्रत्येक परीक्षार्थींची केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनी काळजी घ्यावी, असे म्हटले आहे.

सोलापूरमधील तापमान दररोज ४० अंशावर आहे. तापमान वाढल्याने परीक्षार्थींना थकवा जाणवू शकतो. उष्माघाताचा त्रास देखील होऊ शकतो. थकव्याचा परिणाम गुणांच्या टक्केवारीवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यास तातडीने थंड किंवा सावलीच्या ठिकाणी हलवावे. पाणी किंवा ओआरएस द्यावे, कपडे सैल करावेत.

परीक्षा केंद्रांवरील प्रतीक्षा कक्षात त्यांची सोय करावी, पिण्याच्या पाण्यासाठी कोणालाही नकार देऊ नये, अशा सूचना विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना दिल्या आहेत. अपुरा प्रकाश, वीजेची सोय, पंखे, कुलर नसलेल्या ठिकाणी परीक्षा घेऊ नये, परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवावी, अशाही सूचना विद्यापीठाचे आरोग्याधिकारी डॉ. अभिजीत जगताप, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी केंद्रांना केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande