छ.संभाजीनगर : मराठी शाळा वाचवण्यासाठी नगरसेवकाचे ५ महिन्यांचे मानधन दान
छत्रपती संभाजीनगर, 21 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एका नगरसेवकाने दानशूर पणाची भूमिका घेतली.मराठी शाळा वाचवण्यासाठी नगरसेवकाचे ५ महिन्यांचे मानधन दान म्हणून जाहीर केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठी शाळांची स्थिती सुधारण्
छ.संभाजीनगर : मराठी शाळा वाचवण्यासाठी नगरसेवकाचे ५ महिन्यांचे मानधन दान


छत्रपती संभाजीनगर, 21 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एका नगरसेवकाने दानशूर पणाची भूमिका घेतली.मराठी शाळा वाचवण्यासाठी नगरसेवकाचे ५ महिन्यांचे मानधन दान म्हणून जाहीर केले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या ५ वर्षाचे मानधन शाळेच्या विकासासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.महानगरपालिकेच्या सभेत मराठी शाळांच्या दुरवस्थेवर चर्चा झाली. यावेळी जयस्वाल यांनी केवळ शब्द न वापरता प्रत्यक्ष आर्थिक मदत जाहीर केली. या निधीचा वापर शाळांमधील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि मराठी माध्यमाच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे. नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी हे धाडसी पाऊल उचलले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande