परभणी - सावळी येथे आग लागून शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)। महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे मानवत तालुक्यातील सावळी येथे एका शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहिनीतील बिघाडामुळे लागलेल्या आगीत उभे पीक, कडबा, संत्री आणि ठिबक संच जळाले. ही घटना घडली. यामुळे श
Q


परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)। महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे मानवत तालुक्यातील सावळी येथे एका शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहिनीतील बिघाडामुळे लागलेल्या आगीत उभे पीक, कडबा, संत्री आणि ठिबक संच जळाले. ही घटना घडली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सावळी येथील शेतकरी दत्ता वैजनाथ काळे यांच्या शेतात ही घटना घडली. वीजवाहिनीच्या घर्षणाने ठिणग्या पडून लागलेल्या आगीत दोन एकर क्षेत्रातील ज्वारी, कडबा, ५०० संत्र्याची झाडे आणि ठिबक सिंचन संच जळाला झाला. या आगीत काळे यांचे सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचे नुकसान झाले असून पंचनाम्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जीर्ण वीजवाहिन्या आणि दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. महावितरण केवळ वीजबिल वसुलीत तत्पर आहे, मात्र सुरक्षेत शून्य, अशा शब्दांत शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande