सेलूत चिल्लर व 10-20 रुपयांच्या नोटांची टंचाई; ग्राहक-व्यापारी त्रस्त
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)। सेलू शहरातील बाजारपेठेत सध्या सुटे पैसे (चिल्लर) तसेच 10 व 20 रुपयांच्या नोटांची टंचाई निर्माण झाली असून यामुळे ग्राहक व व्यापारी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील बाजारपेठ सध्या तुलनेने मंद असली तरी
अ


परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)। सेलू शहरातील बाजारपेठेत सध्या सुटे पैसे (चिल्लर) तसेच 10 व 20 रुपयांच्या नोटांची टंचाई निर्माण झाली असून यामुळे ग्राहक व व्यापारी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील बाजारपेठ सध्या तुलनेने मंद असली तरी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना व्यवहार करताना सुट्या पैशांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांकडे नेमके पैसे नसल्याने त्यांना आवश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत किंवा सुटे पैसे मिळावेत म्हणून नको असलेली अतिरिक्त खरेदी करावी लागत आहे.

या परिस्थितीमुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत असून लहान व्यवहार करणे कठीण झाले आहे. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना याचा अधिक फटका बसत आहे.

व्यापाऱ्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली असून, सुट्या पैशांच्या कमतरतेमुळे व्यवहार करताना अडचणी येत असल्याचे सांगितले. काही ठिकाणी डिजिटल पेमेंटचा पर्याय वापरला जात असला तरी सर्वच ग्राहकांकडे तो उपलब्ध नसल्याने समस्या कायम आहे.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच इतर बँकांनी बाजारात सुटे पैसे आणि 10-20 रुपयांच्या नोटांचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी व्यापारी व ग्राहकांकडून करण्यात येत आहे. लवकरच या समस्येवर तोडगा निघावा, अन्यथा दैनंदिन व्यवहार अधिक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande