महापौरांची तत्परता: सायन्सस्कोर मैदानावर उभारणार अत्याधुनिक स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : शहराचे प्रथम नागरिक महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेचा प्रत्यय देत बसस्थानक परिसरातील सायन्सस्कोर मैदानावरील नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घेतली. मैदानाला भेट दिल्यानंतर त्यांनी तेथे
महापौरांची तत्परता: सायन्सस्कोर मैदानावर आता उभारली जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे


अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : शहराचे प्रथम नागरिक महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेचा प्रत्यय देत बसस्थानक परिसरातील सायन्सस्कोर मैदानावरील नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घेतली. मैदानाला भेट दिल्यानंतर त्यांनी तेथे स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

दररोज सकाळी मोठ्या संख्येने नागरिक सायन्सस्कोर मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी येतात. यावेळी नागरिकांनी मैदानावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार महापौरांकडे केली. विशेषतः सध्या सुरू असलेल्या उत्सव आणि मेळाव्यांमुळे परिसरात मोठी गर्दी होत असून, कायमस्वरूपी स्वच्छतागृह नसल्याने महिला, पुरुष तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्वच्छतेचा मुद्दा गांभीर्याने घेत जिल्हा परिषद कार्यालयात चर्चा केली. या चर्चेत संबंधित ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व सुसज्ज स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पाच आधुनिक स्नानगृहे उभारण्याचे निर्देशही देण्यात आले.

महापौरांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाहीलाही सुरुवात केली असून, संबंधित जागा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे.

महापौरांच्या या निर्णयामुळे सकाळी फिरायला येणारे नागरिक, मेळाव्यातील व्यापारी आणि विशेषतः महिलांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे अमरावतीकर नागरिकांकडून त्यांचे कौतुक व्यक्त केले जात आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी तसेच नगरसेविका सौ. सुरेखा लुंगारे उपस्थित होत्या.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande