
पुणे, 21 एप्रिल (हिं.स.)कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांनीच नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. चतु:श्रृंगीच्या टेकडीवरून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, अभिमानश्री सोसायटीकडून बाणेर रस्त्याच्या दिशेने जाणारा नैसर्गिक नाला दस्तुरखुद्द जिल्हा पोलिसांनीच बुजविला असल्याचे समोर आले आहे. यामुळे अभिमानश्री व परिसरातील सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांना तातडीने नोटीस पाठवा, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.
हा नाला बांधकाम करण्यासाठी पोलिसांकडून बुजविला जात आहे. त्यामुळे या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुक्त राम यांनी पावले उचलली आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी या संदर्भात राम यांना निवेदन देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या भागात राहणाऱ्या सोसायट्यांमधील नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना येथील फोटो दाखविले
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु