पुणे - शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांची तपासणी मोहीम
पुणे, 21 एप्रिल, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान १२ प्रकल्पांची पाहणी करण्यात येऊन पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन
पुणे - शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांची तपासणी मोहीम


पुणे, 21 एप्रिल, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान १२ प्रकल्पांची पाहणी करण्यात येऊन पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारे सात प्रकल्प लाखबंद (सील) करण्यात आले.

महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत शहरातील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम व औद्योगिक आस्थापनांकडून होणाऱ्या धूलिकणांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी आणि धडक कारवाया सुरू आहेत. याच अनुषंगाने महापालिकेच्या उपद्रव शोधपथकांमार्फत शहरातील ‘आरएमसी’ प्रकल्पांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १२ प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या सात प्रकल्पांवर लाखबंदीची कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande