पुणे - गुरुवारी शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद
पुणे, 21 एप्रिल, (हिं.स.)। एकीकडे पाणी कपात सुरू होण्याची शक्यता असताना आत दुसरीकडे विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी सकाळी उशि
water


पुणे, 21 एप्रिल, (हिं.स.)। एकीकडे पाणी कपात सुरू होण्याची शक्यता असताना आत दुसरीकडे विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगितले आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (नवीन व जुने), वडगाव, लष्कर, वारजे, चांदणी चौक, गांधी भवन, होळकर आणि भामा आसखेड या सर्व प्रमुख जलकेंद्रांमधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेपासून ते गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अशा पूर्ण २४ तासांच्या कालावधीसाठी हा पाणीपुरवठा बंद राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande