सोलापूर - पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती द्या; निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी
सोलापूर, 21 एप्रिल (हिं.स.)। संपर्कप्रमुख प्रा. सुषमा अंधारे यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीला स्थगिती देऊन पक्ष वाचवावा, अशी मागणी प्रा. अजय दासरी यांनी केली आहे.या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींव
agews


सोलापूर, 21 एप्रिल (हिं.स.)। संपर्कप्रमुख प्रा. सुषमा अंधारे यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीला स्थगिती देऊन पक्ष वाचवावा, अशी मागणी प्रा. अजय दासरी यांनी केली आहे.या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत हालचालींमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सुषमाताई अंधारे यांच्या नियुक्तीबाबत विरोधाभासी माहिती समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

सोलापुरात झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीतील पराभवाची कारणे मांडण्यात आली होती. तसेच पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी वाढल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.

२४ फेब्रुवारी रोजी आयोजित दौऱ्यात ११ विधानसभा व ११ तालुक्यांचा आढावा एका दिवसात घेण्यात आल्याने हा दौरा केवळ औपचारिक ठरल्याची टीका करण्यात आली. ग्रामीण भागात स्वतंत्र बैठका न घेता शहरापुरत्याच बैठकांना मर्यादा घालण्यात आल्याने ग्रामीण कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना व्यक्त झाली.पदनियुक्ती प्रक्रियेत मुलाखत पद्धतीचा अवलंब करण्यात आल्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या या प्रक्रियेबाबत अनेक कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेच्या पारंपरिक कार्यपद्धतीत अशा प्रकारची पद्धत नसल्याचे सांगत या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande