देशभरात विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये अंतराळ प्रयोगशाळा उभारण्याच्या योजनेचा डॉ.जितेंद्र सिंह यांनी घेतला आढावा
- पहिल्या टप्प्यात अशा प्रकारच्या सात प्रयोगशाळा उभारण्यात येणार नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये उभारण्यात येणाऱ्या अंतराळ प्रयोगशाळांच्या
Dr Jitendra Singh Reviews Plan Establish Space Laboratories Universities Colleges Across Country


- पहिल्या टप्प्यात अशा प्रकारच्या सात प्रयोगशाळा उभारण्यात येणार

नवी दिल्ली, 26 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये उभारण्यात येणाऱ्या अंतराळ प्रयोगशाळांच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात, विद्यार्थ्यांना उपग्रह प्रणाली, रॉकेट तंत्रज्ञान आणि मोहिम आरेखन यांचा प्रत्यक्ष कार्याचा अनुभव देण्यासाठी अशा प्रकारच्या सात प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे उद्दीष्ट, भारताच्या विस्तारणाऱ्या अंतराळ क्षेत्रासाठी कौशल्यपूर्ण तरुणांची फळी उभारणे असा असून, या क्षेत्राने गेल्या पाच वर्षांत बिगर सरकारी संस्थांना हे क्षेत्र खुले केल्यानंतर 600 दशलक्ष डॉलर्सहून अधिक खाजगी गुंतवणूक आकर्षित केली आहे.

या आढाव्यापूर्वी भारताच्या अंतराळ सुधारणांमधील प्रगती आणि या क्षेत्राच्या संपूर्ण मूल्यसाखळीमध्ये खाजगी घटकांचा सहभागाविषयी (आयएन-एसपीएसीइ) इन-स्पेस चे अध्यक्ष डॉ. पवन गोयंका यांनी सविस्तर माहिती दिली.

कुशल मनुष्यबळ विकासाचे प्रयत्न सुरू असून, 17 विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाले आहेत आणि जवळपास 900 सहभागींनी उपग्रह निर्मिती, प्रक्षेपक वाहन व्यवस्था आणि अंतराळ सायबर सुरक्षा या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे.विद्यापीठांमधील प्रस्तावित अंतराळ प्रयोगशाळा, प्रत्यक्ष शिकण्याच्या संधी प्रदान करतील आणि कुशल मनुष्यबळाची फळी आणखी बळकट करतील अशी अपेक्षा आहे.

अंतराळ क्षेत्रातील भारताचा जागतिक सहभाग विस्तारत असून 45 हून अधिक देशांबरोबर भागीदारीसह अधिक सखोल झाला आहे.अलीकडील सहकार्यामध्ये सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या देशांशी करार, जागतिक बाजारपेठेत देशांतर्गत स्टार्टअप्सना जोडण्याचे उपक्रम तसंच आंतरराष्ट्रीय अंतराळ व्यासपीठांमध्ये भारतीय कंपन्यांचा सहभाग यांचा समावेश आहे.

इन-स्पेस संस्थेच्या स्थापनेपासून स्टार्टअप्स, एमएसएमई, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांकडून 1000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांनी 129 अधिकृत परवानग्याही मंजूर केल्या आहेत. भारताच्या सुधारित अंतराळ परिसंस्थेवरील वाढता विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande