
नवी दिल्ली , 26 एप्रिल (हिं.स.)।आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, व्हाइट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स असोसिएशन डिनरदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या पोस्टवरून संजय सिंह संतप्त झाले. संजय सिंह म्हणाले, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नकाशावरून मिटवून टाकण्याची भाषा केली होती. ही हिंसा नाही का? हे हिंसेला प्रोत्साहन देणे नाही का?”
पीएम मोदी यांनी ट्रम्पविरोधात एक शब्दही बोलला नाही संजय सिंह पुढे म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशातील लोकांचा अपमान करतात. इतकेच नव्हे तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तुमचे राजकीय करिअर संपवून टाकू, असे म्हटले होते. पण पीएम मोदी यांनी ट्रम्पविरोधात एक शब्दही बोलला नाही. पीएम मोदींना माहीत आहे की ते त्यांचे करिअर संपवू शकतात, तरीही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.”
संजय सिंह म्हणाले, “आज ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला, तर पीएम मोदी पोस्ट करत आहेत की लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. मग १६० मुलांसाठी पीएम मोदी यांनी पोस्ट का केली नाही? भारताला नरक म्हटले गेले, तरीही पीएम मोदी यांनी कोणतीही पोस्ट केली नाही.”
संजय सिंह यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, “ही गुलाम सरकार आणि गुलाम पक्ष आहे. यांची मानसिकता गुलामीची आहे. यांनी देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे संपवण्याचे काम केले आहे. यांची कोणतीही परराष्ट्र नीती नाही.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode